Viacom 18
आजोबा - नातीचं हळूवार भावनिक नातं उलघडणारी हृद्यस्पर्शी कथा ! निरागसतेच्या गावी...श्रद्धेचा खेळ नवा ‘बालपण देगा देवा’ कलर्स मराठीवर !
Posted on June 30th, 2017
Share
Facebook Twitter Google LinkedIn Email

‘बालपण देगा देवा’ ५ जून पासून सोम ते शनि रात्री ९ वा. फक्त कलर्स मराठीवर

मुंबई, २४ मे २०१७ : निरागसतेच्या गावी…श्रद्धेचा खेळ नवा या कथासूत्रावर आधारित नवीन मालिका ‘बालपण देगा देवा’ कलर्स मराठीवर ५ जून पासून सोम ते शनि संध्या. ९ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सेवन्थ सेन्स मिडीया निर्मित आणि गणेश पंडीत लिखित ‘बालपण देगा देवा’ ही आगळीवेगळी मालिका प्रेक्षकांशी एक आगळं वेगळं नातं जोडेल यात शंका नाही. या मालिकेमध्ये आजोबा – नातं यांच्या नात्या पलीकडे समाजामध्ये घडणाऱ्या, चर्चित आणि अतिशय नाजूक विषयाला एका वेगळ्याच प्रकारे प्रेक्षकांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रभावशाली संवादफेक, डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना आणि त्याला विलक्षण अभिनयाची जोड ज्यामुळे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये अभाधित स्थान निर्माण केलेले विक्रम गोखले या मालिकेद्वारे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेमध्ये विक्रम गोखले अण्णांची भूमिका साकारणार असून मैथिली पटवर्धन ही निवोदित बाल कलाकार त्यांच्या नातीची म्हणजेच आनंदी कुलकर्णीच्या भूमिकेत दिसणार आहे. याखेरीज मिलिंद शिंदे, भाग्यश्री राणे, यांच्याही मालिकेमध्ये प्रमुख भूमिका असतील.  

श्रध्दा जर डोळस असेल तर माणसाच्या जगण्याला आधार देते. माणूस श्रद्धेच्या बळावर अनेक अडचणींवर मात करू शकतो. दु:ख आणि वेदनेच्या निखाऱ्यावरून हसत हसत चालू शकतो. पण श्रद्धेचा वापर करून स्वार्थासाठी अंधश्रध्दा बळकट केली आणि एखाद्या व्यक्तीचं माणूसपण नाकारून तिला देवाच्या प्रतिमेत कैद केलं तर … ‘बालपण देगा देवा’ या मालिकेमधून मनोरंजनासोबत श्रध्दा, विश्वास आणि बालपणीची निरागसता यांची सांगड घालत समाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या मालिकेमध्ये प्रेक्षकांना आजोबा-नातीचं हळूवार भावनिक नातं उलघडणारी हृद्यस्पर्शी कथा बघायला मिळणार आहे. ही गोष्ट अल्लड परंतु हुशार, चौकस, निरागस आणि आजोबांची लाडकी आनंदी या १० वर्षाच्या छोट्या मुलीची आहे जीचे आपल्या आजोबांवर जीवापाड प्रेम आहे, तिच्या आजोबांमुळे संस्कारांचा सक्षम असा वारसा तिला मिळाला आहे. अण्णा म्हणजेच केशव कुलकर्णी हे शिस्तप्रिय आहेत त्यांनी आपल्या नातीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. अण्णांचं एकच स्वप्न आहे, त्यांना आनंदीला डॉक्टर बनवायचं आहे. अण्णांचं हे स्वप्न पूर्ण होईल का ? आनंदी आणि अण्णा यांच्या मार्गामध्ये कोणते अडथळे येतील ? अण्णा त्यामधून कसे मार्ग काढतील हे सगळं बघणं रंजक असणार आहे.

या मालिकेच्या निमित्ताने प्रमुख, प्रादेशिक मनोरंजन, व्हायकॉम -18 चे रविश कुमार म्हणाले की, ‘कलर्स मराठीने नेहेमीच मराठी माणसाशी नाळ जोडणारे, समकालीन आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून जे कार्यक्रम आणि मालिकाबघता घेता येतील असे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणले आहेत. बालपण देगा देवा या मालिकेमध्ये देखील लहान मुलीची निरागसता, निराधार अश्या धार्मिक रूढी आणि अंधश्रद्धा ज्या आपल्या समाजामध्ये बऱ्याच काळापासून चालत आल्या आहेत याचे चित्रीकरण करण्यात येणार असून आजोबा आणि नातीचं सुंदर नातं या मालिकेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मालिकेमध्ये आजोबांच्या भूमिकेमध्ये अष्टपैलू अभिनेते विक्रम गोखले असणार आहेत. आम्हाला आशा आहे कि, नवीन मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल.

या मालिकेच्या निमित्ताने बोलताना अष्टपैलू अभिनेते विक्रम गोखले म्हणाले कि, “बालपण देगा देवा या मालिकेमध्ये आजोबा आणि नात याचं नातं म्हणजे दुधा वरच्या सायी सारख नाजूक आहे. इतर वयाच्या मुलामुलींपेक्षा आपली नातं अतिशय हुशार आहे, तिला प्रत्येक गोष्टीचे कार्य समजून घेण्याची सतत उत्कट इच्छा आहे याचं आजोबांना कौतुक आहे. तिला अंधश्रद्धांपासून कसं दूर ठेवायचं हे हा आजोबा त्याचं कर्तव्य मानतो. काही तरी भलतं-सलतं परंपरेने सांगितलेले नाही हे तिला सांगणे तसेच तिच्या सर्व प्रश्नांना वेळ मारून न्यायची असे न करता, तिला समजेल अशा भाषेत सांगणारा असा हा आजोबा आहे. आजोबांचा वैदकीय पेशा आहे, तो ती मुलगी हळूहळू शिकते आहे या गोष्टीच आजोबाला खूप कौतुक आहे”.

हि मालिका म्हणजे कलर्स मराठीने आपल्या प्रेक्षकांकरता केलेला एक प्रयोगशील प्रयत्न आहे, तेव्हा बघायला विसरू नका निरागसतेच्या गावी…श्रद्धेचा खेळ नवा ‘बालपण देगा देवा’ ५ जून पासून सोम ते शनि संध्या. ९ वा. फक्त कलर्स मराठीवर.